मुलीच्या घरून गावी परतणाऱ्या वृद्ध महिलेचा बस मध्ये ह्दयविकारच्या झटक्याने दुर्दवी अंत

मुलीच्या घरून आपल्या गावी जाणाऱ्या वृद्ध महिलेचा ह्दयविकाराच्या त्रिवं झटक्याने बस मध्येच अंत झाला ,हि घटना बुधवारी सकाळी नवसारी जवळ घडली , जवायानें सासूला अमरावती परतवाडा जाणाऱ्या बस मध्ये बसवून दिले होते ,मात्र अचानक तिला ह्दयविकाराचा झटका आल्याने वृद्ध महिलेची प्राणज्योत मावळली ,बस चालकाने थेट जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वार जवळ एसटी दाखल केली.
मुलीच्या घरी आलेल्या आई ने आपल्या गावी जात असताना एस टी तच तिला ह्दयविकाराचा त्रिवं झटका आल्याने ,तिला रुग्णालयात नेण्याआधीच वृद्ध महिलेची बस मध्येच प्राणज्योत मावळली ,या घटनेने बस मध्ये काही वेळ खळबळ उडाली ,हि धक्कादायक घटना नवसारी जवळ बुधवारी सकाळ च्या दरम्यान घडली ,७० वर्षीय पुष्पा रमेश सोनोने वय 70 राहणार साऊर.भातकुली असे मृत्यू पावलेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे ,मृतक वृद्ध महिला काही दिवसा आधी शेगाव नाका परिसरात तिच्या मुलीच्या मुलीकडे आली होती ,बुधवारी मृतक महिलेला तिचे जावाई नरेंद्र काळे यांनी अमरावती परतवाडा जाणाऱ्या बस मध्ये शेगाव नाका येथून बसविले. या दरम्यान बस नवसारी जवळ दाखल झाली असताना बस प्रवासाची तिकीट काढत असताना वृद्ध महिलेला अचानक ह्दयविकाराचा त्रिवं झटका आला आणि काहीच क्षणात तिची प्राणज्योत मावळली ,या घटनेने बस मध्ये काही वेळ खळबळ उडाली ,बस चालकाने थोडा हि विलंब न करता बस थेट जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे नेण्यात आली ,डॉ नी तपासणी करून वृद्ध महिला पुष्पा सोनोने यांना मृत घोषित केले ,या घटनेने मृतकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला