विद्यार्थ्यांनी केली अंतराळाची सहल
अमरावती :- मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा, जेवड व मराठी विज्ञान परिषद विभाग अमरावती यांच्या संयुक्तविद्यमाने विज्ञान व भूगोल या विषयाअंतर्गत दुर्बीणीद्वारे अवकाश निरीक्षण हा कार्यक्रम दिनांक १०/१२/२०२४ रोजी सायंकाळी ६:३० वाजता अतिशय उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.प्रविण गुल्हाने, अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभाग व अध्यक्ष म्हणून मा. श्री. प्रकाशजी मेश्राम, शिक्षणाधिकारी, मनपा, तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. पुकल्प कारंजेकर, विज्ञान लेखक, कु. ज्योती बनसोड, शाळा निरीक्षक, श्री. प्रफुल्ल अनिलकर, केंद्रसमन्वयक उपस्थित होते.
अवकाश निरीक्षणाच्या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून मराठी विज्ञान परिषदेचे श्री. विजय गिरुळकर, (हौशी खगोल अभ्यासक व सदस्य मराठी विज्ञान परिषद अमरावती) प्रा. श्री. सुशिलदत्त बागडे, (सचिव मराठी विज्ञान परिषद अमरावती), प्रा. श्री. वैभव अनासाने, (मराठी विज्ञान परिषद अमरावती), प्रा. श्री.डॉ. दिलीप बडगुजर लाभले. शाळेतील ४०० विद्यार्थ्यांनी या अवकाश निरीक्षणाचा दुर्बीणीद्वारे आनंद घेवुन जणु अंतराळात सहल केल्याचा एक वेगळाच अनुभव व आनंद घेतला. अवकाशातील विविध ग्रह व तारे अतिशय जवळुन पहायला मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या अवकाशासंदर्भातील ज्ञानात भरच पडली. मनपा शाळांमध्ये अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा, जेवड येथे राबविण्यात आल्याने सर्व उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसंच विद्यार्थी यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना सावजी, सहा. शिक्षक श्री. प्रशांत नालसे, कु. चंचल दातीर, वैशाली बुटे, कु.किरण नालिंदे, कु. सोनाली चापके, सौ. हर्षा दिवे, कु. रुबिना शेख, श्री. शिरीष फसाटे, कु. किरण शेंडे, सौ. प्रिया मरोडकर, श्री. भूषण वाघ, आकाश पोंगळे यांनी प्रयत्न केलेत.