चांदीचा मुकुट सह रक्कम होणार होती चोरी मात्र अचानक चोरटा पळाला
मंदिरात असलेला चांदीचा मुकुट सह दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरी करण्याचा प्रयत्नात असलेल्या चोरट्याचा प्लॅन फसला, दर्शनाला मंदिरात आलेल्या भाविकांच्या सतर्कतेने तात्काळ चोरट्याने पळ काढला, हि खळबळजनक घटना १२ डिसेम्बरच्या सकाळी बडनेरा येथील बारीपुरा परिसरात घडली, बडनेरा पोलीस तात्काळ दाखल होऊन अज्ञात चोरट्याच्या शोधात लागले आहे
१२ डिसेम्बर चा दिवस वेळ सकाळ ची नित्य नियमाने भाविक मंदिरात दर्शनाला आले मात्र मंदिरात भाविक आल्याचे कळताच अज्ञात चोरटयाने फोडलेली दानपेटीतील रक्कम सोडून तात्काळ पलायन केले , हि खळबळजनक घटना बडनेरा शहरातील बारीपुरा येथील मंदिरात घडली , बारीपुरा परिसरात अवधूत देवस्थान असून दररोज येथे अवधूत महाराजांच्या दर्शनाला सकाळ संध्याकाळ भाविकाही रेलचेल असते , मात्र १२ डिसेम्बर च्या पहाटे या मंदिरात अज्ञात चोरटयाने प्रवेश करून येथील दानपेटी फोडली ,सोबतच त्याने चांदीचा मुकुट सुद्धा काढला , दानपेटी अनेक दिवसापासून उघडली नसल्याने हजारो रुपये जमा झाले होते. अशात काढ्लेली रक्कम सोबत घेऊन जाण्याच्या बेतात चोरटा असताना अचानक त्याचे दर्शनाला आलेल्या भाविकांवर गेले त्यामुळे आपली चोरी लक्षात येऊन आपण पकडले जाणार या भीतीने त्या चोरट्यानें मंदिरातून तात्काळ पळ काढला , अशात भाविकांच्या सतर्कतेने मंदिरात होणारी मोठी चोरी थोडक्यात बचावली , या घटनेची माहिती बडनेरा पोलिसना समजताच पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला , अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हे दाखल करून पोलीस अज्ञात चोरट्याच्या शोधात लागले आहे