जलजीवन मिशनची ९७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचाराच्या विळख्यात
अकोला :- जीवन प्राधिकरण विभाग अकोला यांच्या अधिनियम ९७ गावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची अकोट व तेल्हारा तालुक्या तील सर्व गावांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा या उद्देशातून गावांतर्गत पाईपलाईन व उंच पाण्याच्या टाक्या उभारणीचे कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत दोन्ही तालुक्यात सुरू असलेल्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार .
असल्याची प्रत्येक गावामध्ये सुजाण नागरिक चर्चा करीत आहेत व मोठ्या प्रमाणात तक्रारी सुद्धा होत आहेत दोन वर्षापासून तालुक्यात सुरू झालेल्या या प्रकल्प मध्ये कॉन्ट्रॅक्टरची मर्जी सांभाळण्याचे काम अधिकारी करत असून त्यांना कामाचा गुणवत्तेचे काही देणे घेणे राहिलेच नाही अकोट तालुक्यातील बोर्डी गावामध्ये १ लाख ९५ हजार लिटर क्षमतेची मुख्य संतुलन पाण्याची टाकी उभारण्यात येत असून या टाकीच्या माध्यमातून, परिसरातील सर्व गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येणार आहे मुख्य संतुलन पाण्याची टाकी बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम चालूच असून याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागा यांच्यामार्फत केले जात आहे.
टाकीचे उभारणी करत असताना संबंधित विभागाचे अभियंता कंत्राटदार तज्ञ इंजिनियर या कामावर कधीच उपलब्ध नसतात त्यामुळे बांधकामात अनेक मोठ्या प्रमाणात त्रुटी निर्माण होऊन राहिल्या या ठिकाणी टाकीचे कॉलम बांधकाम करत असताना एका बाजूने झुकलेले दिसत आहेत त्यामधील लोखंड शिफ्टिंग व्यवस्थित नसून कॉलम भरताना करण्यात येणारे कॉस्टिंग नियमानुसार केलेली जात नाही काँग्रेट असलेल्या बांधकामावर योग्य प्रकारे पाणी टाकल्या जात नाही व पाणी टाकण्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था यांनी आजपर्यंत ही उपलब्ध केली नाही मल्टी अर्बन इन्फ्रा या कंपनीच्या माध्यमातून तालुक्यात सुरू असलेल्या कामांमध्ये मोठी अनिमित्त भ्रष्टाचार असून या भ्रष्टाचाराची तपासणी नाबार्ड कन्सल्टन्सी सर्विसेस पुणे यांच्या मार्फत झाली असून त्यांच्या अहवालात सुरू असलेल्या कामांवर गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत ६ ते ७ गावातील पाणीच्या टाक्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट व एनडीटी टेस्ट करणे गरजेचे आहे.
गावा अंतर्गत पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण प्रकल्प यामध्ये मोठा भ्रष्टाचार असून हे काम अशाच पद्धतीने चालू राहिलास तालुक्यातील जनतेला कधीच स्वच्छ पाणी मिळणार नाही बोर्डी येथील भ्रष्टाचाराचा हा प्रकार तक्रार करून अधिकाऱ्यांना सांगितल्यावर सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करत संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांना लक्षात आणून संबंधित ठेकेदाराकडून हे खराब बांधकाम तात्काळ तोडायला लावले हेच आजही सत्यप्रत डोळ्यासमोर दिसत आहे.
तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चालूच असून याचा सर्व ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कितीतरी मोठ्या प्रमाणात अपघात घडलेले आहेत व गावागावात रस्त्यांची मोठी दयनीय दूरदर्श यांनी करून ठेवली आहे याला हे भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारच जबाबदार आहेत असे प्रत्येक गावातील ग्रामस्थांकडून व केलेल्या तक्रारदार कडून आज रोजी बोलल्या जात आहे,