ज्वलनशील पदार्थ साठवण करणाऱ्या विरुद्ध नागपूर पोलिसांची धडक कारवाई

नागपूर :- परवानगी नसतानाही पेट्रोलियम सह डिझेल सदृश्य जवलनशील पदार्थाची साठवण केल्याची गुप्त माहिती मिळताच नागपूर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सापळा रचून छापा टाकला, यात दोघा सह तब्बल १९ लाख ८५ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला हि धडक कारवाई १२ डिसेम्बरच्या दुपारी करण्यात आली आहे
प्रशासना चे नियम धाब्यावर ठेऊन एका ठिकाणी लाखों किमतीचा जवलनशील पदार्थ साठवून ठेवल्याने हीच गुप्त माहिती पोलिसांना मिळताच नागपूर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने १२ डिसेम्बर च्या दुपारी सापळा रचून धाड टाकून धडक कारवाई केली नागपूर शहरातील जुनी कामठी येथील खासरा क्रमांक 3, कवठा रोड, माऊंट लिटेरा झी स्कूल समोर खैरी, येथे धडक कारवाई करण्यात आली . गुन्हे शाखा पोलीस पथकाने राणी दुर्गावती चौक यशोधरा नगरात राहणारा ३१ वर्षीय आरोपी सिमरन सिंग सतपाल सिंग जोहर , सोबतच महेंद्र नगर टेकानाका राहणारा आरोपी हितेंद्र सिंग गजेंद्र सिंग राठोड या दोघांना ताब्यात घेऊन दोघांविरुद्ध जुनी कामठी पोलिसात कलम 125, 270, 283 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत
१) 22000/- लिटर ज्वालाग्राही पेट्रोलियम सृदष्य ज्वालाग्राही पदार्थ. किंमत अंदाजे 17,60,000/- रुपयांचा मुद्देमाल.
2) एक लोखंडी टँकर 5000 लिटर क्षमतेचा, 05 नग प्लास्टो कंपनीचे 5000 लिटर क्षमतेचे टॅंक किंमत अंदाजे 2,00,000/- रुपयांचा मुद्देमाल.
3) इलेक्ट्रिक मोटर ज्यामध्ये इनलेट व आउटलेट पाईप लागलेले व त्यात पेट्रोल किंवा डिझेल टाकण्याकरता पेट्रोल पंपावर उपयोगी होणारी नोझल असा किंमत अंदाजे 25000/- रुपयांचा असा एकूण 19,लाख 85हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.