दरोडा टाकणाऱ्या कडून पोलिसांनी देशी बनावटी पिस्तुलांसह मुद्देमाल केला जप्त

नागपूर :- गेल्या 11 सप्टेंबरच्या दिवशी नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका इमारतीत अज्ञात पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले असताना पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून पाचही जणांना ताब्यात घेतले. आरोपीकडून देशी बनावटी पिस्तूल सह दरोड्यात वापरला गेलेला ऐवज जप्त केला.
नागपूर शहरातील हुडकेश्वर ते वाठोडा रिंग रोड वर असलेल्या नवीन सुभेदार ठवरे कॉलनीत गेल्या 11 सप्टेंबर च्या दिवशी अज्ञात दरोडेखोरांनी एका इमारतीत प्रवेश दरोडा टाकला होता.याच घटनेची तक्रार हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असून अज्ञात आरोपी विरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी कलम 310,4,310,5,281,125ब, सहकलम 184 आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.पोलिसांनी या घटनेचा तांत्रिक पद्धतीने शोध घेतला. आरोपींनी घरात प्रवेश करण्यापूर्वी तोंडाला मास्क डोक्यावर टोपी घालून आत मध्ये प्रवेश केल्याचे इमारतीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होत.याचीच पोलिसांनी सखोल पाहणी करून आरोपीच्या दिशेने आपला मोर्चा वळविला.अखेर 11 डिसेंबर च्या दिवशी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले.यात आरोपी अमूल सतीश वालदे, अतुल हिरालाल वर्मा,रोहित तोतन घोष, छत्रदेव सिंग तेज बहादुर सिंग, सह अनिल लीलाचंद सरजार या पाच जणांना ताब्यात घेतले.पोलिसांनी आरोपीकडून 50 हजार रुपये किमतीची देशी बनावटी पिस्तूल. दोन जिवंत काडतूस,,दहा हजार रुपयांचा मोबाईल , एक चाकू, मिरची पूड दोरी पेचकस असा मुद्देमाल जप्त केला.