नागपूर शहर पोलिसांनी 8 गोवंश ला दिले जीवनदान, चालकाला घेतले ताब्यात

नागपूर :- नागपूर शहरात गोवंश चा ट्रक येत असल्याची गुप्त माहिती मिळताच कळमना बीट मार्शल पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. यात पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन 3लाख 35 हजार रुपया चा मुद्देमाल जप्त केला, या प्रकरणात पोलिसांनी 8गोवंशला जीवनदान दिले आहेत.
महाराष्ट्राच्या सीमेवरून अनेक मार्गाने गोवंश कटाई करिता अनेक शहरात दाखल होताना दिसून येत आहे.. अशात पोलीस सुद्धा तेवढेच सतर्क असल्याचे दिसून येत आहे. असाच गोवंश ट्रक नागपूर शहरात येत असल्याची गुप्त माहिती मिळताच कळमना बीट मार्शल पोलिसांनी छापा टाकून एम एच 31एफ सी 2489क्रमांकाचा टाटा एस वाहन ताब्यात घेतले. या वाहनाचे चालक आरोपी रितिक गणपत चौधरी याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी टाटा एस वाहनातील आठ गोवंशला जीवनदान दिले. टाटा एस वाहनासह ऐकून तीन लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. वाहन चालकाची कसून विचारणा केली असता मी रोजंदारीने चालक म्हणून आलो असल्याचे त्यांनी पोलिसांकडे स्पष्ट केले. अशात टाटा एस वाहन चालका विरुद्ध गुन्हे दाखल करून गोवंश कोणी पाठवला कोठे जाणार होता त्याचा मालक कोण आहे याच्या तपासात आता पोलीस लागले आहेत.