बडनेरा जुनी वस्ती परिसरातील रेल्वे गेट जवळील साईबाबा मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही बडनेरा ते शिर्डी श्री साई ध्वज मानाची पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले

बडनेरा जुनी वस्ती परिसरातील साईबाबा मंदिर विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून श्री साई बाबा मंदिर विश्वस्त मंडळ शिर्डी, साईबाबा मंदिर रेल्वे क्रॉसिंग जुनी वस्ती बडनेरा,साई सेवक मित्र मंडळ,किरण नगर अमरावती,ओम साई मित्र मंडळ,तारामाता चौक राजापेठ अमरावती,व समस्त साईभक्तांच्या सहयोगाने दि १२डीसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान बडनेरा ते श्री क्षेत्र शिर्डी येथे साई ध्वज मानाची पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.बडनेरा जुनी वस्ती माताफैल परिसरातून निघालेल्या या पदयात्रेत सहभागी साईभक्तांना छोटू मेश्राम यांच्या तर्फे चहा व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले,या प्रसंगी प्रहार चे उमेश मेश्राम व मित्र मंडळनी साई पालखी चे दर्शन घेऊन साईभक्तांना शुभेच्छा दिल्या,तर यवतमाळ रोड वरील गजानन महाराज मंदिरात पवन सोळंके व मित्र परीवारातर्फे दुपारचे जेवण देण्यात आले.या पदयात्रेत महीला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पदयात्रेत संदर्भात आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी काही साईभक्तांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.