मनपा सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे पाणी तपासणीची विशेष मोहीम सुरू

महानगर पालिका अंतर्गत येत असलेले सर्व हॉटेल , खानावळ , रक्त पेढी , पाणी कॅन , आइस फॅक्टरी , चहा चे दुकान, बार ,रेस्टॉरंट , धाबे व इतर ठिकाणच्या अस्थापना , दुकाने ज्या ठिकाणी साथ रोग पसरण्याची शक्यता असते त्या ठिकाणची सुष्मजिव पाणी तपासणी विशेष मोहीम मनपा आयुक्त सचिन कलंत्रे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे यांच्या आदेशाने मोहिमेला सुरुवात करण्यात आली यात साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ रुपेश खडसे यांच्या सह कर्मचाऱ्यांनी मोहीम सुरुवात केली.
शहरात ज्या ज्या आस्थापना यांना बाजार परवाना अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा वापर होत असेल त्या त्या ठिकाणचे पाणी हे दूषित नसले पाहिजे नागरिकांना शुध्द पाणी पिण्यास मिळाले पाहिजे व तिथे काम करणारे व्यक्ती, कामगार हे निरोगी असायला पाहिजे त्या साठी नुकताच प्रशासक यांनी प्रशासकीय ठराव घेऊन आरोग्य विभागाने आरोग्य विषयक नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे ह्या साठी सर्व हॉटेल , बार, खानावळ , रक्त पेढी , पाणी कॅन, चायनीज सेंटर, पंचकर्म व इतर आस्थापना यांची वापरण्यात येणाऱ्या पाणी ची तपासणी करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहे सर्व आस्थापना दुकाने यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग महानगर पालिकेतून पाणी तपासणी करून घ्यावे. आरोग्य विभागातील साथ रोग कक्ष शी संपर्क साधावा अशी माहिती डॉ विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.