श्री संत अच्युत महाराजांच्या भव्य कलश पदयात्रेने पंचक्रोशी निनादली.
श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 8 डिसेंबर रोजी गुरुकुंज आश्रम येथून भव्य कलश पदयात्रा काढण्यात आली ,,पदयात्रेत ढोल-ताशे,टाळ-मृदुंग,सह ठिकठिकाणी पुष्प वृष्टीने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते,, मंदिर परिसरात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ठीक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.. हा नयनरम्य सोहळा पाहन्यायासाठी शेकडो भाविकांनी यावेळी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.
श्री क्षेत्र शेंदूरजना बाजार येथील गुरुमाऊली श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 8 डिसेंबर रोजी गुरुकुंज आश्रम येथून काढण्यात आलेल्या कलश पदयात्रेने पंचक्रोशी अक्षरशः भक्तिरसाने निनादून गेली होती.गुरुमाऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रम येथील महासमाधीचे पूजन करून तेथून पायदळ कलश यात्रा तिवसा शहर व नंतर पुण्यभूमी शेंदुरजना बाजार पर्यत निघाली होती.तेव्हा ती ढोल-ताशे,टाळ-मृदुंग,ठिकठिकाणी पुष्प वर्षावाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते आज मंदिर परिसरात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ठीक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली असून हा नयनरम्य सोहळा पाहन्यायासाठी शेकडो भाविकांनी यावेळी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.
दिनांक 8 डिसेंबर रोजी श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दी समारोपीय महोत्सव व दत्तजयंती महोत्सवाचा कार्यक्रम महाराजांची पुण्यभूमी असलेल्या शेंदुर्जना बाजार येथे सम्पन्न होत असून त्यानिमित्त येणाऱ्या रविवारी या समारोपीय कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री संत अच्युत महाराज सस्थान कडून देण्यात आली आहे. जयंत निखाडे, तिवसा