तीन दिवसा पासून एन आय ए टीम अमरावतीत, युवकांची कसून विचारणा , दुसऱ्या दिवशी सुद्धा संशयित युवकांची केली क्रॉस व्हेरिफिकेशन, देश-विदेशातील काही प्रतिबंधित दशोपदी संघटनाशी संबंध असल्याचा तरुणावर संशय ….

तीन दिवसा पासून एन आय ए टीम अमरावती शहरात तळ ठोकून आहे.. 15दिवसापासून अमरावती शहरातील छाया नगरात पोलिसांना थोडी ही चुणूक नं लावता गोपनीय पद्धतीने रेकी करणाऱ्या एन आय ए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणा च्या टीम ने एका 25वर्ष वयोगटातील तरुणाला ताब्यात घेतले होते. गुरुवारी सायंकाळ पर्यंत त्याची सखोल विचारणा करण्यात आली.. राजापेठ पोलीस स्टेशनं च्या एका खोलीत गोपनीय पद्धतीने माहिती काढण्यात आली. युवकांवर
देश-विदेशातील काही प्रतिबंधित दशोपदी संघटना पाकिस्तानशी संबंध असल्याचा दाट संशय असल्यामुळे एन आय ए पथक लक्ष देऊन आहे. दुसऱ्या दिवशी त्या संशयीतांचे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात आले.केलेल्या चौकशी ची माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली आहे. खुद्द स्थानिक पोलिसांना माहिती होऊ दिली नाही तर प्रसार माध्यमा पासून सुद्धा माहिती गुप्त ठेवण्यात आली.
शनिवारी पुन्हा सकाळी दहा वाजता पासून संशयित युवकाच्या चौकशी ला सुरुवात करण्यात आली.
देश-विदेशातील काही प्रतिबंधित दशोपदी संघटना पाकिस्तानशी संबंध असल्याचा तरुणावर संशय असल्या ने
राष्ट्रीय तपास यंत्रणा कडून ताब्यात घेतलेल्या संशयित तरुणाची उलट तपासणी करण्यात सुरुवात केली आहे