LIVE STREAM

Crime NewsLatest NewsMaharashtra

बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप

बीड :- शहरातील 2019 च्या खून प्रकरणात न्यायालयाने आज महत्त्वूपूर्ण निकाला दिला आहे. शिक्षक साजेद अली खून प्रकरणी विक्षिकालीन ठरवलेल्या 14 आरोपींपैकी गुजर खान उर्फ अन्वर खान मिर्झा खान याच्यासह 12 आरोपींना अजन्म कारावास म्हणजेच जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. उर्वरित दोघांपैकी एकाला पाच वर्षाचा कारावास व पाच लाख रूपये दंडाची तर दुसऱ्याला सहा महिन्याचा कारावास व पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेच्या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विशेष मोका न्यायालयाने प्रथमच एवढ्या आरोपींना एकाचवेळी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे, बीडमधील हा निकाल ऐतिहासिक मानला जात आहे.

बीड शहरातील बालेपीर भागात 19 सप्टेंबर 2019 रोजी सैनिकी विद्यालयातील शिक्षक सय्यद साजेद अली (वय 37) यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण 18 आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणात 18 आरोपी होते. या प्रकरणात बीडच्या विशेष मोक्का न्यायालयाने 18 पैकी 14 जणांना दोषी ठरवले होते. आज झालेल्या सुनावणीत विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी 14 पैकी 12 आरोपींना वेगवेगळ्या कलमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. उर्वरित दोघांपैकी एकाला पाच वर्षाचा कारावास व पाच लाख रूपये दंडाची तर दुसऱ्याला सहा महिन्याचा कारावास व पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या 12 जणांना जन्मठेप –

अन्यर खान उर्फ गुजर खान मिर्झा खान (रा. गुलशन नगर बालेपीर बीड), मुजीब खान मिर्झा खान पठाण, सय्यद नासेर सय्यद नुर, सय्यद शाहरूख सय्यद नुर, शेख उवेद शेख बाबु, शेख सरफराज उर्फ सरू डॉन, शेख शहेबाज शेख कलीम (रा. रोशनपुरा बीड), शेख अमर शेख अकबर (रा. गुलशन नगर बीड), शेख बबर शेख युसूफ (रा. खासबाग बीड), आवेज काझी (रा. काझी नगर बालेपीर बीड), शेख इम्रान उर्फ काला शेख रशीद (रा. काझी नगर बालेपीर बीड), शेख मझहर उर्फ काल्या उर्फ हाफ मर्डर शेख रहीम (रा. बांगर नाला बीड) या बारा जणांना अजन्म कमावास म्हणजेच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!