भाजपा ने युवाओं के अंगूठे काटे – राहुल गांधी कांग्रेस ने सिखों के गले काटे – अनुराग ठाकुर भाजपाकडून संविधानावर 24 तास हल्ले सुरू, राहुल गांधी यांचा गंभीर आरोप, मोठा गदारोळ

नुकताच हिवाळी अधिवेशनात संसदेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. देशाच्या संविधानाबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले, संविधान आमचा आधार आहे. यासोबतच त्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले की, सरकार अदानीला मदत करत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या पत्रकार परिषदमध्ये राहुल गांधी यांनी एका तिजोरीमधून नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे फोटो काढले होते.
भाजपा सर्वकाही अदानीला देत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. आज परत संसदेत राहुल गांधी हे अदानीबद्दल बोलताना दिसले. अदानीच्या मुद्दावरून केंद्र सरकारला राहुल गांधी यांनी धारेवर धरले. उत्तर प्रदेशमध्ये संविधान लागू नाहीये, असंही ते म्हणाले. उत्तर प्रदेशमधील अत्याचाराचा मुद्दा राहुल गांधी यांनी संसदेत मांडला. पीडित मुलीचे कुटुंबिय घरात बंद असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, सावरकर म्हणाले होते की, संविधानात भारतीय काहीही नाही. देशात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जातोय. भाजपाकडून रोज संविधानावर आक्रमण केले जात असल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलाय. राहुल गांधी यांच्या भाषणानंतर संसदेचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसतंय.