रस्त्यावर असलेल्या पाईपवर दुचाकी ची धडक, दोघांचा अंत

नागपूर :- रस्त्यावर पडून असलेल्या मोठया पाईपलाईन वर दुचाकी भरदाव वेगाने दुचाकी भिडली. यात दुचाकी वरील दोन स्वारांचा जागीच अंत झाला..ही धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली. पोलिसांनी या प्रकरणात कंत्राटदार विरुद्ध गुन्हे दाखल केले.
नागपूर शहरात रस्त्यावर पडून असलेल्या पाईप वर दुचाकी भिडल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात मात्र दुचाकी वर जाणाऱ्या दोघांचा करून अंत झाला. ही धक्कादायक घटना नागपूर शहरातील यशोधरा पोलीस स्टेशनं हद्दीत घडली. असताव्यस्त मनमर्जी पणाने रस्त्यावर ठेवलेल्या पाईप ला दुचाकी ने जोरदार धडक दिली.
या घटनेची माहिती मिळताच नागपूर वरिष्ठ पोलीस अधिकारी सह यशोधरा नगर पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी धाव घेतली.घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून दोघांना रुग्णालयात दाखल केले असता डॉ नी दोघांनाही मृत घोषित केले.
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी 13 डिसेंबरला दुपारी साडेपाच वाजता दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर ठेवलेल्या पाईपलाईनला दुचाकीची जोरदार धडक लागल्याने दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पाईपलाईन कॉन्ट्रॅक्टर विरोधात यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी स्पष्ट केली.