शिंदेंचा राहुल गांधींना सवाल, लोकसभेत गदारोळ

संविधानाला 75 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेत चर्चा सूरू आहे. या चर्चासत्रात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे सहभागी झाले. श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाआधी राहुल गांधी यांनी संविधानावर भाषण केले होते. या भाषणात राहुल गांधी यांनी सावकरांवर भाजपला घेरलं होतं. राहुल गांधी यांच्या या भाषणाचा आधार घेत श्रीकांत शिंदे यांनी त्यांना भाषणाच्या सुरूवातीलाच संविधानावर बोलण सोडून इतर अनेक विषायांवर ते बोलून गेले,असा चिमटा काढला.
श्रीकांत शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, राहुल गांधी जी तुमच्या आज्जीने इंदिरा गांधीजींनी सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते. त्यामुळे इंदिरा गांधी संविधान विरोधी होत्या का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
राहुलजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्या आजी देखील संविधानविरोधी होत्या का? तुम्हाला रोज सावरकरांवर उलट-सुलट बोलण्याची सवय आहे. आम्ही सर्वजण सावरकरांची पूजा करतो त्याचा आम्हाला अभिमान आहे.
याच संविधानामुळे सामान्य घरातील नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवलं. याच संविधानानं सामान्य घरातील ऑटोरीक्षा चालवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवलं. भाषण श्रीकांत शिंदे
श्रीकांत शिंदे यांनी आपलं नाव घेतल्यानं राहुल गांधी यांनी उभं राहून उत्तर देण्याची मागणी केली. त्यानंतर या किरेन रिजिजू यांनी जर एका खासदाराने कोणाचे नाव घेतलं तर उत्तर देण्याचा अधिकार ज्यांचे नाव घेतले गेले त्यांना आहे, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांचे भाषण संपल्यावर राहुल गांधी बोलू शकतात, असे म्हटले. पीठासीन अधिकारी कृष्ण प्रसाद तेन्नटी यांनी तात्काळ बोलण्याती परवानगी नाकारली. शिंदे यांचं भाषण झाल्यानंतर तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल असं तेन्नटी यांनी सांगितलं. पण, त्या उत्तरानं समाधान न झालेल्या काँग्रेस खासदारांनी लोकसभेत गोंधळ सुरु केला. या गदारोळानंतर राहुल गांधी यांनी उठून श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर उत्तर दिले. यावेळी राहुल गांधी म्हणाले, मी लहान असताना आजीला त्यावर प्रश्न विचारला तर त्यावर त्या म्हणाल्या, सावरकरांनी इंग्रजांशी तडजोड केली, लेटर लिहील आणि माफी मागितली, असा पलटवार त्यांनी श्रीकांत शिंदेवर केला. – राहुल गांधी
श्रीकांत शिंदे यांनी या गोंधळातच भाषण सुरु ठेवलं. याच संविधानानं काँग्रेसला 400 हून 40 वर आणलं. याच संविधानानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव केला. त्यांच्या पक्षाला विरोधी पक्ष नेतेपदही मिळालं नाही, अशी आठवण शिंदे यांनी करुन दिली. तसेच विरोधकांनी रिकामी पानांचे संविधान हातात घेऊन लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हने मते मिळवली, अशी टीका श्रीकांत शिंदेंनी यावेळी केली. तसेच काँग्रेसचा सुरुवातीपासून डॉ. बाबासाहेबांना विरोध होता. काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला होता, असा हल्लाबोल श्रीकांत शिंदे यांनी केला. – श्रीकांत शिंदे