LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

 शिंदेंचे ठरले, कॅबिनेटमध्ये कोकणचे तीन चेहरे, नावं ठरली; ठाकरेसेनेचा धुव्वा उडवणाऱ्या संधी

रत्नागिरी :- उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे : – महायुती सरकार सत्तेवर येऊन आठवडा उलटला आहे. पण अद्याप तरी कॅबिनेटचा विस्तार झालेला नाही. १६ डिसेंबरपासून म्हणजेच येत्या सोमवारपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्याआधी म्हणजेच १५ डिसेंबरला कॅबिनेटचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. त्यात शिवसेनेला १२ मंत्रिपदं मिळू शकतात. यातील ९ मंत्रिपद कॅबिनेट दर्जाची असतील.

शिवसेनेकडून मंत्रिमंडळात अनेक नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. काही माजी मंत्र्यांविरोधात पक्षाच्या आमदारांमध्येच नाराजी आहे. मंत्री असताना कामं केली नाही. निव्वळ आश्वासनं दिली, अशा तक्रारी काही माजी मंत्र्यांविरोधात आहेत. त्यामुळे शिंदे त्यांना डच्चू देण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत, दीपक केसरकर, संजय राठोड, अब्दुल सत्तार या माजी मंत्र्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांचा पत्ता कट होऊ शकतो.

शिंदेंच्या शिवसेनेला कोकणानं चांगली साथ दिली. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात शिंदेंनी उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिला. त्यामुळे शिंदेंकडून कोकणातील ३ जणांना मंत्रिपदी संधी देण्यात येणार आहे. उदय सामंत, भरत गोगावले आणि योगेश कदम यांची नावं मंत्रिपदांसाठी निश्चित झालेली आहेत.

उदय सामंत मागील मंत्रिमंडळात उद्योग मंत्री होते. त्याआधी ठाकरेंच्या सरकारमध्येही त्यांच्याकडे मंत्रिपदं होतं. त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. दापोलीचे आमदार योगेश कदम, महाडचे आमदार भरत गोगावले यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. गोगावले सलग चौथ्यांदा, तर योगेश कदम दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे सामंत, गोगावले, कदम या तिन्ही नेत्यांनी ठाकरेसेनेच्या उमेदवारांचा पराभव करत पुन्हा विधानसभा गाठली आहे.

मागील मंत्रिमंडळात शिंदेंनी कोकणातील दोघांना संधी दिली होती. उदय सामंत, दीपक केसरकर यांची मंत्रिपदी वर्णी लागलेली होती. पण यातील केसरकर यांना यंदा डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. भरत गोगावले, योगेश कदम यांच्या रुपात सेनेकडून नवे चेहरे दिले जाणार आहेत. भरत गोगावले गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. शिंदेंनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं होतं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!