शेतकऱ्यांच्या शेतीला सापन प्रकल्पाचं पाणी सिंचनासाठी

मेळघाट :- शेतकऱ्यांची जमीन सुजलाम सुफलाम व्हावी यासाठी मेळघाट मतदार संघामध्ये सापन प्रकल्प राबवण्यात आला मात्र हा प्रकल्प गेल्या १० वर्षांपासून रखडल्याने शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणीच पोचल नव्हतं हत्ती गेला अन शेपूट राह्यलं अशी परिस्थिती होती आता या प्रकल्पाचं काम सुरु झालं आहे त्यामुळे ११ किलोमीटर क्षेत्रातील शेतकऱ्यांची जमीन सुपीक होणार आहे.
मेळघाट मतदार संघामध्ये येणाऱ्या बझार गावामध्ये पूर्णा मध्यम प्रकल्पाच्या सापन प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तलावाचे पाणी आता शेतकऱ्यांच्या शेतीला मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मागील दहा वर्षापासून तयार केलेली कॅनल मध्ये अद्यापही पाणी येत नव्हतं. परंतु आता या कॅनलच रुंदीकरण करून याच्या खाली कॉंक्रिटीकरण केल्या जात आहे. काँक्रीटची भर टाकल्यानंतर तलावाचे पाणी हे सरळ शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी पोचणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे 11 km क्षेत्रामध्ये असलेला भाग सुपीक होणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळात सुरू झालेली योजना पूर्ण झाली नाही रवासा कन्स्ट्रक्शन कंपनीने हे काम घेतलं होतं परंतु राज्य सरकारने त्याला पूर्ण बिल दिले नाही म्हणून काम पूर्ण झालं नाही. ते आता १० वर्षांनंतर पूर्णत्वाला जात आहे.