अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न
अमरावती :- अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेचे आज दिनांक १५/१२/२०२४ रोजी सकाळी ०९/०० वाजता मा.श्री विशाल आनंद, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांचे हस्ते व मा.श्री पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण तसेच परीक्षेत्रातील अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, अमरावती शहर , अकोला येथील पोलीस खेळाडू अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत पार पडला आहे.
अमरावती परीक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा दिनांक १५/१२/२०२४ ते २०/१२/२०२४ या दरम्यान आयोजित करण्यात आली असून यावर्षीचे यजमान पद हे अमरावती ग्रामीण पोलीस घटकाकडे आहे. सदर स्पर्धे दरम्यान हॉकी, फुटबॉल, बास्केट बॉल, हँडबॉल, कबड्डी, हॉलीबॉल, धावणे, भालाफेक, इ. सर्व प्रकारच्या सांघीक व वैयक्तिक क्रिडा प्रकारांचा समावेश आहे. सदर स्पर्धा जोग स्टेडीयम, फुटबॉल ग्राऊंड तसेच श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे संपन्न होणार आहे. स्पर्धे करिता परीक्षेत्रातील प्रत्येक पोलीस घटकातून १५० खेळाडू प्रमाणे जवळपास ९०० खेळाडूंचा सहभाग सदर स्पर्धेत होणार आहे. सदर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या, खेळाडुंची राज्यस्तरीय महाराष्ट्र पोलीस क्रिडा स्पर्धेकरिता निवड करण्यात येणार आहे.
आलेल्या सर्व खेळाडूची निवासाची व्यवस्था अमरावती ग्रामीण घटकाकडून करण्यात आली आहे. सदर स्पर्धेची सांगता व बक्षिस वितरण सोहळा मा. श्री रामनाथ पोकळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परीक्षेत्र अमरावती यांचे हस्ते परीक्षेत्रातील सर्व घटकाचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व वरीष्ठ पोलीस अधिकारी यांचे उपस्थितीत होणार आहे.