छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान का नाही ? अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई :- महायुती सरकारचा आज रविवारी शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी अजित पवार गटातील काही नावे निश्चित झाली आहेत. अजित पवार गटाच्या यादीत दिग्गज नेत्यांना डच्चू मिळाला आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज झाल्याचीही चर्चा आहे. या सर्व नाराजीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते नागपुरातील मेळाव्यात बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान का मिळाले नाही, याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्यक्ती एकत्र बसणार आहे. २ महिन्यात महामंडळाची निवड पार पडणार आहेत. मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देत नाही. काही जणांना मागच्या वेळी दीड वर्ष टर्म मिळाली. आम्ही आता ठरवलं आहे. आता ५ वर्षात मंत्र्यांना अडीच अडीच वर्ष टर्म देण्यात येणार आहे. आमचं त्यावर एकमत झालं आहे’.