जमील कॉलनी येथील विचित्र अपघातात अल्पवयीन मुलाचा मृत्यू

अमरावती :- जमील कॉलनी मशिदीजवळ विचित्र अपघात झाला काहीही ध्यानी मनी नसतांना हा अपघात झाला आणि या अपघातात अल्पवयीन मुलाचा हकनाक बळी गेला दोघे अल्पवयीन मुलं एक्टिवा दुचाकीवरून जात होते. त्याच्या दुचाकीसमोर एम एच 24,व्ही, 0343 क्रमांकाची स्कॉर्पियो होती या गाडीसमोर काही आडवं आल्याने स्कॉर्पियो अचानक थांबली . बहुदा दुचाकी भरधाव असावी स्कॉर्पिओ थांबताच दुचाकीवरील मागे बसलेला अल्पवयीन मुलगा थेट स्कॉर्पिओच्या चाकात आला , चिरडला गेला . दुचाकी चालवणारा अल्पवयीन हा किरकोळ जखमी झाला घटना स्थळी नागरिकांनि प्रचण्ड गर्दी केली. नागपुरी गेट पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले त्यानी मृतक व जखमी मुलाला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेलं. पोलिसांनी स्कॉर्पिओ ताब्यात घेतली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात सुद्धा नागरिकांनी मोठी गर्दी केली अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देताना पालकांनीही जागरूकता बाळगायला पाहिजे असं आवाहन सिटी न्यूज करत आहे