दोन दिवसाच्या तापाने ३५ वर्षांच्या इंजिनिअर तरुणाचा मृत्यू

अमरावती :- ३५ वर्षांच्या युवकाचा साध्या तापाने एकाएकी मृत्यू झाला . डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने या युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे दीपक रमेश आठवले या युवकच नाव असून कवाडे नगर अकोला. येथील मूळचा रहिवासी आहे अमरावतीला नोकरीच्या निमित्याने त्याच वास्तव्य होतं जुना बायपास वरील एम आय डी सी मधील सोलर कंपनीत इंजिनियर म्हणून तो काम करत होता यासंदभात नातेवाईकांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.
अमरावतीला नोकरीच्या निमित्याने रहाणाऱ्या अकोल्याच्या युवकाचा दोन दिवसाच्या तापाने मृत्यू झाला डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय अमरावती त लॉर्ड हॉटेल जवळ आदिशक्ती अपार्टमेंट मध्ये भाड्याने रहाणारा ३५ वर्षीय दीपक रमेश आठवले जुना बायपास वरील एम आय डी सी मधील सोलर कंपनीत इंजिनियर म्हणून दीड वर्षापासून कामाला होता मूळचा अकोला येथील तो रहिवासी होता. दिपकला. गुरुवारी ताप आला, गोपाल नगर येथील डॉ विवेक भोयर यांच्याकडे त्याला नेण्यात आलं एक सलाईन देऊन डॉक्टरांनी परत पाठवलं शनिवारी पुन्हा तब्येत खराब झाली. पुन्हा डॉ भोयर कडे गेले. डॉ ने पुन्हा सलाईन मध्ये तीन इंजेकशन देऊन घरी पाठवलं घरी आल्यावर प्रचंड घाम आला.थंडी हि वाजल्याने आई ने डॉ ला फोन करून माहिती दिली डॉ घरी येऊन पुन्हा एक इंजेकशन दिले असता डोळ्यासमोर अंधारी येत असल्याचे सांगितल्याने रेडियन्ट हॉस्पिटल मध्ये नेलं तेथे बेड उपलब्ध नसल्याचे डॉ भोयर यांनी सांगून पुन्हा इर्विनला आणलं असता जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉ ने मृत घोषित केले.. डॉ भोयर च्या हलगर्जी पणावर ठपका मृतकाचा नातेवाईकांनी ठेवलाय यासंदभात नातेवाईकांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.