रात्रभरच्या प्रतिक्षेनंतर अखेर भाजप आमदारांचे फोन वाजलेकोण होणार मंत्री ? झाले स्पष्ट

नागपुरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. महायुतीकडून आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नागपुरातील राजभवनातील लॉनमध्ये हा शपथविधी सोहळा रंगणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 21 दिवस झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला आहे. तर, दुसरीकडे भाजपचे आमदारही रात्रभर वेटिंगवर राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्री पद शपथेबाबतचा निरोप देणारा फोन न आल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली होती. आज सायंकाळी होणाऱ्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदारांना निरोप देण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तार कराताना महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून प्रादेशिक समतोल साधण्याचा कसोशीनं प्रयत्न होताना दिसतोय. प्रादेशिक आणि जातीय समीकरणांसोबत पक्षवाढीसाठी फायदेशीर ठरण्याऱ्या नेत्यांना प्राध्यान्य मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपकडून आपल्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाची यादी शनिवारीच देण्यात आली होती. या यादीवर पक्ष श्रेष्ठींकडून दुपारपर्यंत शिक्कामोर्तब होणे अपेक्षित होते. मात्र, रात्र उलटून गेल्यानंतरही फोन न आल्याने इच्छुक आमदारांची धाकधूक वाढली होती. अखेर आज सकाळपासून भाजप आमदारांचे फोन खणखणू लागले आहेत.
भाजपा कडून कोणाला आले मंत्रिपदासाठीचे फोन? तर भाजपकडून काही ज्येष्ठांना मंत्रिमंडळातून आराम देण्यात येणार आहे. आणि काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. भाजपकडून नितेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोयर, जयकुमार रावल यांनी मंत्रीपदासाठीचे निरोप देण्यात आले आहेत. त्याशिवाय, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे. त्यांना देखील फोन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पंकजा मुंडे यांनाही संधी मिळणार आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हे देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर, राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही फोन आला. गणेश नाईक, मेघना बोर्डिकर यांनाही मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.
पुण्यातील पार्वती मतदारसंघाच्या चार टर्मच्या आमदार माधुरी मिसाळ यांना देखील संधी मिळाली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनाही अखेर मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. त्याशिवाय, जयकुमार गोरे, अशोक उईके देखील मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर शिवसेनेच्या 5 माजी मंत्र्याना पुनः मंत्रमंडलात स्थान दिल्या जाणार आहे, ज्यात कोकण चे उदय सामंत, पश्चिम महाराष्ट्र चे शंभुराजे देसाई, उत्तर महाराष्ट्रतून गुलाबराव पाटील आणि दादा भुसे तर विदर्भतून संजय राठोड यांची लोटेरी लागणार आहे आणि नवीन चेहरे कोणते आहेत, तर मराठवाडा संजय शिरसाट, रायगड चे भरतशेठ गोगावले पश्चिम महाराष्ट्र तून प्रकाश अबिटकर, कोकण चे योगेश कदम, विदर्भ चे आशिष जैस्वाल, ठाणे चे प्रताप सरनाईक यांची नावे पुढे येत आहेत आणि दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांची मात्र तिकीट कट झाली आहे, मंत्रिमंडळातील गृहनिर्माण और पर्यटन हे दोन विभाग शिवसेना कडे राहतील अशी ही चर्चा आहे.
नागपुरातील शपथविधी सोहळा हा विधिमंडळाच्या इतिहासातील दुसराच प्रसंग असणार आहे. सुमारे 33 वर्षांपूर्वी पहिल्यांदा 21 डिसेंबर 1991 रोजी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडला होता. शिवसेनेत पडलेल्या पहिल्या फुटीनंतर नागपूरच्या राजभवनात छगन भुजबळ यांच्यासह सात जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्रीपदी दिवंगत सुधाकरराव नाईक होते.
मग जर चंद्रशेखर बावणकुले मंत्रिपदाची शपथ घेतील तर भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाची कोणाकडे सोपवण्यात येणार आहे जबाबदारी?
अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद हे डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. 2029 साली भाजपाने शतप्रतिशत भाजपा म्हणजेच स्वबळावर सत्तेत येण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीनेच ही नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 2029 मध्ये एकट्या भाजपाचे 200 हून अधिक आमदार निवडून आणण्याचं उद्दीष्ट समोर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळेच फडणवीस मुख्यमंत्री असतानाच त्यांचे निकटवर्तीय असलेल्या रविंद्र चव्हाणांवर भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. रविंद्र चव्हाण हे एक उत्तम संघटक म्हणून पक्षात ओळखले जातात. तसेच फडणवीस यांच्याकडून पडद्यामागे होणाऱ्या अनेक हलचालींमध्ये रविंद्र चव्हाणांचा सक्रीय सहभाग असतो असं सांगितलं जातं.