शिंगणापूर येथील काळा मारुती मंदिरातील दानपेटी फोडली

शिंगणापूर येथील काळा मारुती मंदिरात चोरटयाने पुजाऱ्याच्या गळ्याला चाकू लावून चोरी केली हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय १४ डिसेम्बरच्या रात्री दीड वाजता हि चोरी झालीय. ७० हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केलाय
खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिंगणापूर येथील काळा मारुती देवस्थान मध्ये चोरट्याने चोरी केली. मारुती च्या बाजू ला १ किलो चांदीचा पत्रा लावलेला आहे त्यातील 60 हजार रुपये किमतीचा पत्रा काढून नेला आणि मंदिरातील दानपेटी मध्ये असलेले 10 हजार रुपये असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरला. मंदिरामध्ये प्रवेश करून पुजाराच्या गळ्याला चाकू लावून चोरी केली. हि घटना १४ डिसेंबर च्या मध्यरात्रीच्या दीड वाजताच्या सुमारा ला घडली
पुजारी गजानन टवलारे यांनी संस्थेच्या विश्वस्त मंडळाला ही हकीकत सांगितली मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे दिसून आलेत गजानन टवलारे यांनी खोलापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविलीय त्यांच्या तक्रारीवरून खोलापूर पोलिसांनी अज्ञात चोरत्या विरुद्ध ३०५ बी.एन.एस नुसार गुन्हा नोंदविलाय , चोरीचा तपास खोलापूर पोलीस करीत आहे,