Crime NewsLatest NewsMaharashtra
परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाचा मृत्यू

कारागृहात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सोमनाथ सुर्यवंशी असे ३५ वर्षीय मयत तरुणचे नाव , छातीत कळ येत असल्याची जेल प्रशासनाला माहिती दिल्यानंतर रुग्णालयात आणल्यावर झाला मृत्यू- शहाजी उमप.
अकरा तारखेला घडलेल्या प्रकारात आरोपी असलेला काय नाव त्याच सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला, आज सकाळी छातीत कळ येत असल्याची तक्रार त्याने जेल ऑथॉरिटी कडे केली होती. त्या आधारावर जेल ऑथॉरिटीने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती केले मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. सोमनाथ हा वडार समाजाचा असून पुणे येथे राहणारा आहे. तो दगडफेकी प्रकरणातील आरोपी होता. परभणीकरांनी शांतता अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे सगळी टेक्निकल फॉर्मलिटी पूर्ण करण्यात येणार आहे.