माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार :- राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल (15डिसेंबर) ला नागपुरच्या राजभवन येथे संपन्न झाला. महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, मराठवाड्यातून शिवसेनेचे एकमेव मंत्री असणारे संजय शिरसाट यांनी मंत्रिपदासह गोपनियतेची शपथ घेतली. शपथ घेताना वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर असल्याचं सांगत मंत्री होण्याचं अनेक दिवसांपासूनचं स्वप्न असल्याचं त्यांनी सांगितलं. आईनं माझा शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल. एका काळात ज्या मुलांना खायला नव्हतं ते राज्याचं नेतृत्व करणार याचा तिलाही अभिमान असेल. हे चित्र डोळ्यांसमोर साठवून ठेवत होतो. असं म्हणत संजय शिरसाट भावूक झाले होते.बाळासाहेबांमुळंच हे मिळालंय. हे नाटकी नाही. ते होते म्हणून आम्ही राजकारणात आलो.
मंत्रीपदाचे स्वप्न मी निश्चित पाहिलं होतं. आपण एकदा तरी मंत्री झाला पाहिजे असं वाटलं होतं. मंत्र्याचा रुबाब, काम करण्याची पद्धत हे आता अनुभवत आहे. आजचा दिवस महत्त्वाचा आणि आनंदाचा होता. आयुष्यात ह्या अनुभवायला मिळेल की नाही माहित नव्हतं पण ते आज मिळतंय याचा आनंद आहे.
माझे वडील ST ड्रायव्हर..
माझे वडील ST ड्रायव्हर होते. त्या मला सांगायचे आपला झोपडीत एकदा शंकरराव चव्हाण निघून गेले होते. ती आठवण त्यांनी शेवटपर्यंत जपली. आता त्यांचा मुलगा चार वेळा आमदार होतो कॅबिनेट मंत्री होतो, माझे वडील हायात असते तर त्यांना किती आनंद झाला असता.. माझी आई वयस्कर आहे. मला मंत्रीपदाची शपथ घेताना तिने टीव्हीवर पाहिला असेल. तिलाही वाटेल माझ्या आयुष्याचा चीज झालं. ज्या मुलांना कधी काळी खायला नव्हतं ती आज या राज्याचा नेतृत्व करतात याचा तिला अभिमान वाटत असेल. हा क्षण शपथ घेताना मी माझ्या डोळ्यांसमोर आठवत होतो. असं संजय शिरसाठ म्हणाले.
बाळासाहेबांमुळंच हे वैभव
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांमुळेच हे सगळं मिळाला आहे. हे नाटकी नाही. ही सत्यता आहे. ते होते म्हणून मी राजकारणात आलो. ते होते म्हणून आमदार.. त्यांच्यामुळे हे वैभव पाहायला मिळालं. कष्ट आम्हीही केले आहेत. परंतु त्यांचं नेतृत्व खंबीर आमच्या पाठीशी उभ होतो. त्या नेतृत्वाला तोड नाही. आजही शिवसेनाप्रमुखाचं नाव घेतल्यावर छाती भरून येते. जर तो माणूस आमचा आयुष्यात नसता तर मी कुठे असतो. त्यामुळे त्यांच्या सदैव ऋणात राहणार. त्यांच्या आठवणी आमच्यातून जाणार नाही. असं शिरसाट म्हणाले. ज्या पदावर जाल त्या पदाला न्याय देणार. ज्यांना असं वाटतं मंत्रीपदावर गेलो म्हणजे माझा रुबाब वाढला. फक्त रुबाब नको वाढायला, तू लोकांमध्ये जायला पाहिजे. एकनाथ शिंदे लोकनेता म्हणून ओळखले जातात. पदाला न्याय देता आलं पाहिजे. लोकांचे प्रेम मिळालं की आयुष्यात काही कमी पडत नाही. असंही ते म्हणाले.