राज्यभरातुन टाटा कंपनीच्या इंडीका, इंडीका व्हिस्टा चारचाकी गाड्या चोरी करणारा अट्टल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

अमरावती :- दिनांक ०३/१२/२०२४ रोजी फि’ सचिन किसनराव वरघट वय ३४ वर्ष, रा. घुईखेड ता. धामणगाव रेल्वे यांनी पो स्टे. तळेगाव दशासर येथे तक्रार दिली की, त्यांचे मालकीची टाटा कंपनीची इंडीगो ई.सी. चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. ४० के. आर. ९७५० कि.अं. १,००,०००/- रु चौ त्यांचे घरासमोर उभी असतांना दिनांक ०२/१२/२०२४ चे रात्रीदरम्यान अज्ञात चोरटयाने सदर चारचाकी वाहन चोरुन नेले. अशा फि’ चे जबानी रिपोर्ट वरुन पो.स्टे. तळेगाव दशासर येथे अप.क्र. ३८९/२०२४ कलम ३०३ (२) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच अशाच प्रकारचा गुन्हा पो.स्टे. लोणी हद्दीत घडल्याने तेथे अप.क्र. ३२३/२०२४ कलम ३०३(२) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
आरोपी नाव :-
१) प्रफुल उर्फ बबलु गजानन गांगकर वय ३५ वर्ष, रा. देवळी जि. वर्धा ह.मु. भारत नगरी, यवतमाळ
२) सैफुद्दीन इजाजुद्दीन खान वय २८ वर्ष, रा. आझाद नगर, नई वस्ती टेका, नागपुर
३) मो. एहतेशाम उर्फ अत्तु मो. इरफान वय ३२ वर्ष, रा. मोमीनपुरा, नागपुर
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद सा. (भा. पो.से.), अमरावती ग्रामीण यांनी चारचाकी चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा घालून टोळीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामिण येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत सूचना निर्गमीत कलया होत्या.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा., अम.ग्रा. येथील चांदुर रेल्वे उपविभागातील पो.उप.नि. मो. तस्लीम व दर्यापुर उपविभागातील पो.उप.नि. नितीन इंगोले यांचे पथक चारचाकी चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना पथकाला गोर्पानिय बातमीदारामार्फत खबर मिळाली की, सदरचे गुन्हे हे प्रफुल गजानन गांगेकर रा. देवळी जि. वर्धा हा करत असुन तो यवतमाळ येथील भारत नगरी येथे त्याचे कुटूंबासह मागील काही महिण्यापासुन भाड्याने राहत आहे. परंतु तो सदया पुलगांव जि. वर्धा येथे गेला असल्याची खबर मिळाल्याने पथकाने ग्राम नाचनगाव चौफुली, पुलगाव येथुन प्रफुल गजानन गांगेकर वय ३५ वर्ष, रा. यवतमाळ याला ताब्यात घेतले.
वरुन ताब्यात असलेला १) प्रफुल गजानन गांगेकर वय ३५ वर्ष, रा. यवतमाळ यास चारचाकी चोरीचे गुन्हयासंबंधाने विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने अमरावती ग्रामीण घटकातील १) पो.स्टे. तळेगाव दशासर हद्दीतील ग्राम घुईखेड, २) पो.स्टे. लोणी हद्दीतील ग्राम लोणी येथून चारचाकी गाडी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच पो.स्टे. बडनेरा जि. अमरावती शहर येथून २ चारचाकी व पो.स्टे. अवधुतवाडी जि. यवतमाळ हद्दीतुन २ चारचाकी अशा एकुण ६ चारचाकी गाड्या चोरी केल्या असल्याची कबुली देवून पो.स्टे. तळेगाव व पो.स्टे. लोणी हद्दीतुन चोरी केलेल्या इंडीका व्हिस्टा क्रमांक एम.एच. २७ ए.सी. ६०२२ व इंडीगो ई.सी. क्रमांक एम.एच.४० के.आर. ९७५० हया दोन्ही गाडया २) सैफुद्दीन इजाजुद्दीन खान रा. आझाद नगर, नई वस्त्री टेका, नागपुर यास विक्री केल्याचे सांगीतले. वरुन सैफुद्दीन यास ताब्यात घेवून विचारपुस करुन त्याचे ताब्यातुन एक इंडीका व्हिस्टा क्रमांक एम.एच. २७ ए.सी. ६०२२ जप्ती पत्रकाप्रमाणे ताब्यात घेतली व इंडीगो ई.सी.क्रमांक एम.एच.४० के. आर. ९७५० हया गाडीबाबत सैफुद्दीन यास
विचारले असता नागपुर येथील भंगार व्यापारी ३) मो. एहत्तेशाम उर्फ अत्तु मो. ईरफान रा. मोमीनपुरा, नागपुर याला स्क्रैप करीता विक्री केल्याचे सांगीतले. वरुन भंगार व्यापारी मो. एहत्तेशाम याचे ताब्यातुन नमुद गाडीचा चेचीस क्रमांक व गाडीचे तुकडे असा एकूण २०,०००/-रु चा माल जप्त केला.
आरोपी कडून चारचाकी चोरीचे पतीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहे.
१) पो.स्टे. तळेगाव दशासर अप.क्र. ३८९/२४ क. ३०३ (२) भा.न्या.सं.
२) पो.स्टे. लोणी अप.क्र. ३२३/२४ क. ३०३(२) भा.न्या.सं.
३) पो.स्टे. बडनेरा जि. अमरावती शहर अप.क्र. ५५३/२२ क. ३७९ भादंवी
४) पो.स्टे. बडनेरा जि. अमरावती शहर अप.क्र. ५४४/२२ क. ३७९ भादंवी
५) पो.स्टे. अवधुतवाडी, जि. यवतमाळ अप.क्र. १००३/२२ क ३७९ भादंवी
६) पो.स्टे. अवधुतवाडी, जि. यवतमाळ अप.क्र. ११९६/२४ क. ३७९ भादंवी
नमुद आरोपीचे ताब्यातुन १) इंडीका व्हिस्टा क्रमांक एम.एच. २७ ए.सी. ६०२२ कि.अं. १,५०,०००/-रु २) गाडी चोरी करण्यासाठी वापरलेले साहित्य कि.अं.५०००/- ३) वेगवेगळया कंपनीचे २ मोबाईल कि.अं. ११,०००/- ४) इंडीगो ई.सी.क्रमांक एम.एच.४० के.आर. ९७५० या स्क्रैप केलेल्या गाडीचे तुकडे कि.अं. २०,०००/- व गुन्हा करण्यासाठी वापरलेली इंडीगो कार क्र.एम.एच.४० ए ८४७० कि.अं. १,५०,०००/- असा एकुण ३,३६,०००/-रु चा मुदेमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडुन एकुण ६ गुन्हयाची उकल करण्यात आली असुन तपासात अधिक गुन्हयांची उकल होण्याची शक्यता असुन सदर आरोपीतांना पुढील तपास कामी पो.स्टे. तळेगाव दशासर यांचे ताब्यात देण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत सा.. अमरावती ग्रामीण, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. मोहम्मद तस्लीम, पो.उप.नि. नितीन इंगोले, श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, पोलीस अंमलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे सचिन मसांगे, दिनेश कनोजीया, सुनिल महात्मे, निलेश डांगीर, व पोलीस स्टेशन सायबर चे सागर धापड, रितेश वानखडे, चेतन गुल्हाने, गुणवंत शिरसाठ चालक अंमलदार संजय प्रधान, हर्षद घुसे यांनी केली.