Latest NewsMaharashtra
लाडकी बहीण योजना :- सत्तास्थापन झाली, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आता लाडक्या बहिणींना पैसे कधी येणार ?

लाडकी बहीण योजना :- महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी’मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना सुरु केली. मात्र सध्या डिसेंबर महिना आला तर महिलांच्या बँक अंकाउंटमध्ये लाडकी बहिण योजनेचा नवीन हप्ता आलेला नाही. सत्तास्थापन झाली, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आता लाडक्या बहिणींना पैसे कधी येणार? हा प्रश्न महिलांना पडलेला आहे.
सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे परंतु अजून खातेवाटप बाकी आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खातेवाटप झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. महिला व बालविकास खाते ज्यांच्याकडे असेल ते जीआर काढतील. त्यानंतर पैसे महिलांच्या अकाउंटमध्ये जमा केले जातील.