केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करून अमरावतीत काँग्रेस आक्रमक झाली आहे, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधि कारी सौरभ कटियार याना निवेदन दिलं अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली,य अमित शहा यांच्या वक्तव्याचा काँग्रेसने निषेध केला
अमरावती जिल्हा काँग्रेस कमेटी,काँग्रेस अनुसूचित जाती जमाती सेल यांनी जिल्हधिकारी सौरभ कटियार याना निवेदन दिलं व आपलं म्हणणं मांडलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने अमरावतीत काँग्रेस आक्रमक झाली आहे, अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली, अमित शहा यांच्या वक्तव्याचा काँग्रेसने निषेध केला परभणी येथे आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या निरअपराध लोकांवर सुरू असलेली कारवाई थांबावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे काँग्रेसने लावून धरली,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.अमित शहा यांनी माफी मागितली नाही तर आक्रमक उग्र आंदोलन करू असा इशारा काँग्रेसने दिला.