LIVE STREAM

Latest NewsMaharashtraPopular News

खुशखबर! लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार, डिसेंबर-जानेवारीचे ३००० रुपये एकत्र मिळणार ?

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. ते या हफ्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत होते. अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे.

कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हफ्ते सक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीआधी ३००० हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली. जुलै महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळत आहेत. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत ५ महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाला आहेत. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत ७५०० रुपये जमा झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आधीच देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हफ्ता एकत्र मिळणार आहेत. अशामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी आर्जदारांचा आकडा २ कोटी ४७ लाखांपर्यंत आहे.

तसंच, राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच २१०० रुपये जमा होणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा निर्णय मार्च महिन्यामध्ये महायुती सरकार घेणार आहे. मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हफ्ता देण्याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!