भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेराच्या वतीने कार्यक्रम

संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी घडलेल्या हिंसाचारात परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या भीम सैनिकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याने या घटनेचा निषेध करून त्याला श्रद्धांजली देण्यात आली बडनेरा येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा कार्यालय आठवडी बाजार येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.
परभणी येथे संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी राज्यभरात निषेध करून आंदोलन छेडण्यात आलं. भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेराच्या वतीने आठवडी बाजार येथे परभणीच्या घटनेचा निषेध करण्यात आला शहीद सोमनाथ सूर्यवंशीला पुष्पचक वाहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच भारतीय बौद्ध महासभा व आंबेडकर वादी चळवळीतील संघटनांनी 17 डिसेंबर ला सायंकाळी सात वाजता बडनेरा पोलीस स्टेशन मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. श्रद्धांजली कार्यक्रमात आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना सिटी न्यूज कडे व्यक्त केल्या.