वाळूची तस्करी करणारा ट्रॅक्टर महसूल च्या भरारी पथकाने पकडला
अमरावती :- भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या सर्वच वाळू घाटातील अवैध वाळू तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी तहसीलदार डॉ. अजित कुमार येळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरु आहे गौण खनिजाच्या तस्करीला आळा बसवण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून सातत्याने तालुक्यातील विविध ठिकाणी धाडसत्र सुरूच आहे.
पूर्णा नगर ते इस्लामपूर मार्गावर अवैधरित्या वाळूची तस्करी करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या भरारी पथकाने पकडला
महसूल विभागाच्या भरारी पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पूर्णा नगर ते इस्लामपूर पांदण रस्त्याने जाणारा वाळू ने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पकडला सागर प्रमोद मोहोड रा पूर्णा नगर असे वाहन चालकाचे नाव आहे, सदर ट्रॅक्टर – ट्रॉली पुढील कारवाई करिता आसेगाव पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आली आहे.
मंडळ अधिकारी गौरव सुरपाटणे, ग्राम महसूल अधिकारी मनोज बेले, विशाल दहाट, मोहम्मद अश्फाक, कोतवाल पवन मांजरे, संतोष सहारे, प्रशांत बिरे यांनि हि कारवाई केली भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या सर्वच वाळू घाटातील अवैध वाळू तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी तहसीलदार डॉ. अजित कुमार येळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरु आहे