LIVE STREAM

India NewsLatest NewsMaharashtra

5 रुपयांची ‘ती’ नाणी चलनातून का काढली ? RBI ने दिलं उत्तर, बांगलादेश कनेक्शन उघड

RBI Bank :-  दैनंदिन व्यवहारातून 5 रुपयांची नाणी बंद का झाली अशा चर्चा सध्या सुरू आहेत. या चर्चेमागची नेमकी सत्यता काय आहे हे पडताळून घेऊया. सध्या देशात 1 रुपयांपासून ते 20 रुपयांपर्यंतचे शिक्के चलनात आहे. सध्या चलनात दोन प्रकारच्या 5 रुपयांची नाणी चलनात आहेत. एक पितळेचे ब्रास तर दुसरे नाणे जाड असून ते धातुंपासून बनवण्यात आले आहे. सध्या जाड असलेले पाच रुपयांच्या नाण्याचे चलन खूप कमी झाले आहे. त्यामागचे कारण जाणून घेऊया. 

सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने जाड आणि वजनाने जास्त असलेल्या पाच रुपयांच्या नाणी बंद केली आहेत. देशात चलनात असलेली नवीन नाणी आणि नोटा छापण्याचा अधिकार आरबीआयला असतो. त्यामुळे नाणी, नोटा सुरु करण्याचा, बंद करण्याचा, त्यात बदल करण्याचे महत्वाचे निर्णय आरबीआय घेत असते. त्याप्रमाणेच हा निर्णय आरबीआयने घेतला आहे.

5 रुपयांची जाडी बंद करण्याचे कारण समोर आले आहे. नाण्याच्या उत्पादनात वापरण्यात येणारा धातू वितळवून चार ते पाच ब्लेड बनवता येतात. ज्यांची किंमत ५ रुपयांपेक्षा जास्त असते. या आर्थिक कारणामुळे सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने ही पाच रुपयांची नाणी बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. एका पाच रुपयांच्या नाण्यामुळं 4-5 ब्लेड बनवण्यात येतात. ज्याची एकूण किंमत 10 रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच नाण्यांच्या किंमतीपेक्षा त्याची किंमत अधिक आहे.

तसंच, बांगलादेशात या नाण्यांची अवैधरित्या तस्करी केली जात असल्याचेही समोर आले आहे. बांगलादेशात ही नाणी वितळवून त्याचे रेजर ब्लेड बनवण्यात यायचे. एका नाण्यापासून सहा ब्लेड बनवण्यात येऊ शकतात. ज्याची किंमत प्रति ब्लेड 2 रुपये इतकी आहे. नाण्यातील धातूचे आंतरिक मूल्य त्याच्या आर्थिक मूल्यापेक्षा जास्त आहे. या आणि अशा अनेक कारणांमुळे RBI ने जाड पाच रुपयांच्या नाण्यांसारखी इतर काही नाण्यांचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला.

नवीन 5 रुपयांची नाणी :-

या सर्व समस्या लक्षात घेऊन सरकार आणि RBI ने 5 रुपयांच्या नाण्याचे डिझाइन आणि धातुल बदल केला आहे. नवीन शिक्क्यांची जाडी कमी करुन त्यात स्वस्त धातुंचे मिश्रण टाकण्यात आले आहे. त्यामुळं ही नाणी वितळवून त्यांपासून ब्लेड बनवणे कठिम आहे. केंद्र सरकार आणि RBI ने वेळेच हा मुद्दा सोडवून तस्करीवर लगाम लावला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!