अफगाणिस्तानमध्ये एकाच रस्त्यावर दोन भीषण अपघात; ५० लोकांचा मृत्यू, जखमी गझनी रुग्णालयात

अफगाणिस्तान :- अफगाणिस्तानमध्ये एकाच रस्त्यावर दोन भीषण अपघात झाले आहेत. यामध्ये ५० लोकांचा मृत्यू झाला असून ७६ जण जखमी झाले आहेत.
दक्षिण-पूर्व भागात हे अपघात झाले आहेत. पहिल्या अपघातात काबुल ते कंधाहर हायवेवर प्रवासी बस एका ऑईल टँकरवर आदळली. दुसरा अपघातही बस आणि गॅस टँकर यांच्यातच तो ही याच हायवेवर झाला आहे. दोन्ही अपघातात ५० जणांचा मृत्यू झाल्याचे गझनी प्रांत सरकारचे प्रवक्ते हाफिज उमर यांनी म्हटले आहे.
‘दुर्घटनेत जखमी झालेल्यांना गझनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे ते म्हणाले. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना काबुलला हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.
खराब रस्त्यांची परिस्थिती, बेपर्वा वाहन चालवणे आणि रहदारीच्या नियमांचे पालन न करणे हे अशा प्राणघातक घटनांना कारणीभूत ठरणारे प्रमुख कारण असल्याचे तेथील माध्यमांनी म्हटले आहे. राजधानीला दक्षिणेकडील प्रांतांशी जोडणारा काबूल कंधार महामार्ग हा एक महत्त्वाचा मार्ग आहे, खराब रस्ता आणि अवजड वाहतुकीमुळे आधीपासूनच हा रस्ता अपघातांसाठी ओळखला जातो.