आफ्रिकेत पसरतोय ‘डिंगा डिंगा’, या आजारामुळे रुग्ण नाचू लागतात

डिंगा डिंगा :- आफ्रिकेतील युगांडामध्ये जवळपास ३०० लोक एका गूढ आजाराचे बळी ठरले आहेत. या आजाराला ‘डिंगा डिंगा’ असे नाव देण्यात आले आहे. IANS च्या रिपोर्टनुसार, हा आजार प्रामुख्याने महिला आणि मुलींमध्ये दिसून येत आहे. या आजारामुळे खूप ताप येतो आणि शरीरही सतत थरथरत असते. शरीर जास्त थरथरत असल्यामुळे या आजाराचा रुग्ण सतत हालत राहतो, म्हणून सीडीसीने या आजाराला डिंगा डिंगा म्हणजेच नाचण्याचा आजार असे नाव दिले आहे.
आफ्रिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. कियिता क्रिस्टोफर यांनी सांगितले की, या आजारावर सध्या अँटिबायोटिक औषधांनी उपचार केले जात आहेत. आतापर्यंत कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. तसेच, हा आजार कसा आला आणि तो का पसरत आहे, याची अचूक माहिती अद्याप आरोग्य विभागाला मिळालेली नाही. दरम्यान, सध्या रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये (DRC) डिंगा डिंगा रोगाचे रुग्ण सामान्यतः बरे होत आहेत.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार (WHO) येथे ३९४ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आफ्रिकेचे आरोग्य विभाग डिंगा डिंगा या आजाराच्या प्रादुर्भावाचे कारण शोधत आहे. इन्फ्लूएन्झा, कोविड-१९, मलेरिया किंवा गोवर यांसारखे संसर्ग या आजाराचे कारण आहेत का, याचा शोध घेतला जात आहे, मात्र सध्या डिंगा डिंगा या आजाराच्या प्रादुर्भावाची कारणे समजू शकलेली नाहीत. ज्या भागात हा आजार पसरत आहे, तेथे लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. हा आजार सांसर्गिक मानला जातो आणि त्याचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरण्याची भीती व्यक्त केली जाते.
डिंगा डिंगा आजाराची लक्षणं
ताप येणे
डोकेदुखी
खोकला
सर्दी आणि अंगदुखी