आ. रवी राणा यांचा चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर पहिला जनता दरबार

बडनेरा :- बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनता दरबाराचं आयोजन केलं जिल्ह्यातील अनेक विषयांवर आमदार रवी राणा यांनी चर्चा केली तहसीलदार, भुमिअभिलेख, आरोग्य अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी येथे उपस्थित होते त्याच्याशी चर्चा केली.
अमरावती जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत आ रवी राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार भरवला चौथ्यांदा आमदार झाल्यांनतर त्यानी प्रथमच जनता दरबार भरवला यावेळी पुष्पगुछ देऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आ. रवी राणा यांचं स्वागत केलं.यावेळी युवा स्वाभिमानाच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या . शेतकरी शेतमजूर अंध अपंग यांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबारामध्ये आ. रवी राणा यांनी चर्चा केली पेढी प्रकल्पाच्या कामांचा आढावा त्यानी घेतला निम्न पेढी प्रकल्पामध्ये पुनर्वसनामध्ये गावांना जागा उपलब्ध करून दिली पाहिजे याकरिता वलगाव मार्गावरील 65 एकर जमीन देण्याचे आश्वासन दिलं यासंर्भात त्यानी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अनेक वर्षापासून निम्नपेढी प्रकल्पाचा रखडलेला प्रश्न निकाली लावला पुढच्या महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत असं राणा म्हणाले.
शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर सुद्धा आ. रवी राणा यांनी चर्चा केली. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी त्यानी अधिकाऱ्यांना ताकीद दिली.