LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

एसटी कर्मचाऱ्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यां चे आरोग्य अबाधित राहावे,या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना महामंडळ यांच्या ठरावा नुसार ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात आली आहे .

राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी व कर्मचारी ज्यांचे वय ४० वर्ष व त्यापेक्षा अधिक आहे .त्यांना दर दोन आर्थिक वर्षातून एकदा सर्व वैद्यकीय तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. याअंतर्गत सी.बी.सी.,थायरॉईड,ब्लड शुगर-ए. एच.बी.ए.आय.सी.,कोलेस्ट्रॉल, लिव्हर फंक्शन,किडनी फंक्शन,बोन डेन्सीट्री, एक्स-रे,ई.सी.जी.,सी.आर.पी.टेस्ट, आय.टेस्ट यासोबतच महिला कर्मचाऱ्यांकरिता मॅमोग्राफी आदी तपासण्या करणे बंधनकारक करण्यात आले आहे.सदर बाबीचे प्राप्त परिपत्रकानुसार अमरावती विभागात याची नियमितपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे महाराष्ट्रात उप-महाव्यवस्थापक(प्रशिक्षण),कार्यशाळा व्यवस्थापक,विभाग नियंत्रक यांच्या वतीने आपापसात योग्य तो समन्वय साधून संबंधित योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्या जात आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना अमरावती विभाग विभाग नियंत्रक-निलेश बेलसरे यांनी दिली प्रतिक्रिया.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!