अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ कडुन अवैध्यरित्या गांजा विक्री करणा-या इसमांवर धडक कारवाई

अमरावती :- मा. पोलीस आयुक्त साहेब यांनी आदेश दिले होते की, अमरावती शहरातील सराईत गुन्हेगांवर पाळत ठेवुन त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करून तसेच प्रतिबंध कार्यवाही करावी तसेच अवैदयरित्या अंमली पदार्थ विक्री, वाहतुक करणा-या इसमांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत आदेश प्राप्त झालेवरून पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट क. २ यांचे नेतृत्वात पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार नेमुन खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.
दि. १९/१२/२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ चे पथक हे आयुक्तालय हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पेट्रोलींग दरम्यान गुप्त बातमीदाराकडुन खात्री लायक माहीती मिळाली की, दोन इसम हे पो.स्टे. नादगांव पेठ हद्दीतील रहाटगांव, रिंगरोड येथे गांजा विक्री करण्याकरीता येत आहे. अशा खात्री लायक माहीती वरून रहाटगांव, रिंगरोड येथे गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ चे पथकाने चोखपने गांजा घेवुन जाणा-या इसमांविरूध्द सापळा रचुन थांबले असता दोन इसम हे रहाटगांव, रिंगरोड टी पॉइंट येथे दिसुन आले वरून नमुद दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव गांव.
१) अब्दुल्ला खान रहेमान खान वय ३५ वर्ष रा. कमेला ग्राउंड, पठाणपुरा, अमरावती
२) कृष्णा बाबुराव बारस्कर वय २२ वर्ष रा. संजय कॉलनी, बैतुल, (मध्य प्रदेश) असे नावे सांगितले त्यांचे ताब्यातुन ५.७१५ किलो ग्राम गांजामाल व इतर साहित्य असा एकुण किंमत १,२४,३०० रूपये चा मुद्देमाल मिळुन आल्याने ते जप्त करून नमुद आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन नादगांव पेठ येथे अपराध क्रमांक ४५९/२०२४ कलम २०, २२ एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले.
सदर ची कारवाई मा. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी साहेब, अमरावती शहर यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे साहेब, पोलीस उपायुक्त श्रीमती कल्पना बारावकर मॅडम, पोलीस उपायुक्त श्री. सागर पाटील साहेब, सहायक पोलीस आयुक्त गुन्हेशाखा, श्री. शिवाजी बचाटे साहेब, पोनि. श्री. बाबाराव अवचार साहेब, गुन्हे शाखा युनिट २ अमरावती शहर, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगाले, सपोनि योगेश इंगळे, सपोनि अनिकेत कासार (सायबर) पोउपनि संजय वानखडे, पोलीस अंमलदार – गजानन ढेवले, अजय मिश्रा, दिपक सुंदरकर, सुधिर गुळधे, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, चेतन कराडे, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, चेतन शर्मा यांनी केली आहे.