आणखी किती बिबट्यांचा होणार अपघाती अंत

अमरावती :- अमरावती शहराच्या टोकावर असलेल्या वडाळी वनक्षेत्रात एकीकडे बिबट ची संख्या वाढल्याचे वनविभाग बोलत आहे तर दुसरीकडे या मुक्या प्राण्याचा अपघातात अंत होत असल्याच्या धक्कादायक घटना वारंवार घडत आहे ,, गुरुवारी मध्यरात्री रस्त्यावरून जाणाऱ्या दीड वर्ष वयाच्या नर बिबट ला अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात बिबट्याचा मृत्यू झाला एका आटोचालकाने बिबट्याचा मृतदेह रस्त्यावरून एका कडेला केला गेल्या ६ वर्षात कितीतरी बिबटे अपघातात मृत्य झाल्याची माहिती समोर आली आहे .
नवीन बायपास मार्गावरील महादेवखोरी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला , गुरुवारी मध्यरात्री रास्ता ओलांडून जाणाऱ्या दीड वर्ष वयाच्या नर बिबट ला अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात बिबट्या दगावला. एका आटोचालकाने बिबट्याचा मृतदेह रस्त्याच्या मध्यभागातून उचलून एका कडेला केला . वनाधिकाऱ्यांनी घटना स्थळी पंचनामा करून मृत बिबट चे वडाळी जंगलात अंतिम संस्कार केले .एकीकडे वडाळी , पोहरा मालखेड वनपरीक्षेत्रात बिबट आणि इतर हिस्त्रप्राण्यांची संख्या वाढल्याचा गाजावाजा केला जात आहे तर दुसरकिडे बिबटे वारंवार रस्त्यावर अपघातात मृत्युमुखी पडताहेत वनविभागकरिता शोकांतिकेची बाब नाही का, सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या २०१७ ते २०२४ वर्षात आता पर्यत ६ निष्पाप बिबट चा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे ,
एकीकडे वन्यप्राण्यांचं जतन करण्याकरता प्रयत्न होताहेत तर दुसरीकडे वन्यविभाग कुठलीही काळजी घेत नसल्याचं बिबटयाच्या मृत्यूवरून दिसून येत आहे. बडनेरा ते रहाटगाव व चांदुर रेल्वे मार्गावर आतापर्यन्त अनेक बिबट्यांचा अपघातात अंत झाला आहे तेव्हा वनविभागाने त्याच्या क्षेत्रात पाणवठे तयार करणे तसंच रस्ते ओलांडून बिबटे येऊ नये यासाठी सुरक्षा भिंत किंवा जाळ्या लावणं गरजेचं आहे तेव्हाच बिबट्यांचे अपघात व पर्यायाने मृत्यू थांबतील