कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांचे पोलिसांनी वाचवले जीव
धारणी :- धारणीच्या ग्रामीण भागात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मुस्लिम कब्रस्तान च्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये दहा ते बारा गाई कत्तल करण्याचे उद्देशाने हातपाय बांधून, त्यांची चारा पाण्याची सोय न करता क्रूरपणे बांधून ठेवण्यात आले आहेत. अशा मिळालेल्या गुप्त खबरे वरून ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने कारवाई करून सदर गायींना ताब्यात घेतले.
दिनांक 16 12 2024 रोजी सायंकाळी पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मुस्लिम कब्रस्तान च्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये दहा ते बारा गाई कत्तल करण्याचे उद्देशाने हातपाय बांधून, त्यांची चारा पाण्याची सोय न करता क्रूरपणे बांधून ठेवण्यात आले आहेत. अशा मिळालेल्या गुप्त खबरे वरून ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने कारवाई करून सदर गायींना ताब्यात घेतले.तसेच त्यांना बाबंदा येथील वंदे मातरम गोरक्षण येथे सुरक्षित ठेवण्यात आले. सरकारतर्फे पोलीस कर्मचारी मोहित आकाशे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पशु संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.