Latest NewsVidarbh Samachar
गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा -काँग्रेस
यवतमाळ :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्हा काँग्रेस आणि आंबेडकर अनुयायांनी यवतमाळ च्या बस स्टँड चौकात आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जो पर्यंत अमित शहा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही तो पर्यंत जिल्ह्यात आंदोलन सुरू राहील . असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी यावेळी बोलतांना दिला .आजच्या या आंदोलनात जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, माजी मंत्री वसंत पुरके,अरविंद वाढोनकर या सह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते