डॉक्टरांचा हलगर्जीपणा भोवला रुग्णाला
यवतमाळ :- शासनाकडून अनेक रुग्णांवर निःशुल्क व शासकीय योजनेचा समावेश करून उपचार केला जातो. जनतेच्या भल्या करिता व आर्थिक गळचेपी होऊ नये तसेच गंभीर स्वरूपाच्या मोठ्या किमतीच्या ऑपरेशन करिता शासनाकडून पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार केला जातो. अशताच श्री वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व त्यांच्या निष्काळजीपणामुळे मंगेश भगत या युवकाचा पाय निकामी झाल्याचा आरोप भगत यांनी केलाय. या प्रकरणी डॉक्टरांवर तसेच अधिष्ठता डीन यांच्यावर कलम ३४ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भगत यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
यवतमाळच्या श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मंगेश भगत यांच्या उजव्या पायाचे ऑपरेशन जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आले. या ऑपरेशनला ११ महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा रुग्णांचा पाय दुरुस्त झाला नाही. वारंवार रुग्णालयात जाऊन पायाची तपासणी केली मात्र डॉक्टरांकडून उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. तसेच डॉक्टरांनी आपली चूक लपविण्याकरिता भगत यांचा पाय कापायला प्रयत्न केला व भगत यांना कायमस्वरूपी अपंगत्व दिले असा गंभीर आरोप पीडित रुग्ण भगत यांनी केलाय. माझ्यावर अन्याय करणाऱ्या दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी भगत यांनी केली आहे.