दिल्लीच्या पोलिसांत राहुल गांधी विरोधात गुन्हे दाखल, काँग्रेस ने केले आंदोलन

दिल्ली :- गुरुवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत टिप्पनी केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस ने संसद समोर आंदोलन केले होते त्यात सत्ताधारी पक्षातील खासदारांनी सुद्धा आंदोलन केले होते या दरम्यान सत्ताधारी विरोधक आमने सामने आल्याने भाजपा खा प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत चोरील हे जमिनीवर पडून जखमी झाले होते.. यात दोन्हीही भाजपा खासदार आय सी यु मध्ये दाखल होऊन उपचार घेत आहे.या घटनेत भाजप खा सारंगी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आरोप करण्यात आला होता यात दिल्ली पोलिसांत तक्रार केल्याने राहुल गांधी यांच्या विरोधात कलम 109,115,117अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले..याच घटनेच्या निषेधार्थ पुन्हा शुक्रवारी राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हे दाखल केल्याने काँग्रेस सह विरोधी पक्षातील खासदारानी संसद समोर आंदोलन केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हाती घेऊन संसद भवन पर्यत मार्च .काढण्यात आला.. या दरम्यान राज्यसभा लोकसभा सदनात प्रचंड गदारोळ करण्यात आला शेवटी दोन्हीही सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले..