बडनेरा मार्गावरील कार श्रुंगार कॉम्प्रेसमध्ये शिरली कार , रात्रीची घटना
समोरून वाहन आल्याने भरदाव वेगाने येणारी कार बडनेरा मार्गावरील थेट कार शृंगार प्रतिष्ठान च्या च्या कॉम्प्रेसमध्ये शिरली, सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी नाही, यात रिलायन्स कंपनीचा कर्मचारी असल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली, तर याच कार मध्ये काही युवक युवती होते अशी चर्चा सुद्धा घटनास्थळ येथे आढळून आली.
गुरुवारच्या मध्यरात्री बडनेरा मार्गावर असलेल्या रुद्राक्ष मंगल कार्यालय नजीक असलेल्या कार शृंगार या प्रतिष्ठानात भरदाव वेगाने कार शिरली. एम एच ०२ डी झेड २७१५ क्रमांकाची कार सुसाट वेगाने कार श्रुंगार च्या शेटर ला जाऊन धडकली, यात कोण्ही गंभीर जखमी नसल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी स्पष्ट केली यात रिलायन्स कंपनीचा कर्मचारी वाहन चालवीत असल्याची माहिती समोर येत आहे, समोरून वाहन येत असताना त्याला वाचविण्यासाठी भरदाव वेगाने असलेली कारचे स्टेरिंग ब्लॉक झाल्याने कार थेट दुकानावर भिडली, या अपघातात कार चे मोठे नुकसान झाले आहे, सकाळी नागरिकांनी अपघात पाहायला मोठी गर्दी केली होती. मात्र दुसरीकडे याच कार मध्ये काही युवक युवती असल्याची चर्चा सुद्धा घटनास्थळ येथे चर्चा दिसून आली