मित्राच्या बहिणीच्या हळदीवरुन येताना आक्रित, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू…

जळगाव अपघात :- सध्या जिल्ह्यामध्ये अपघाताच्या प्रमाणात दररोज वाढ होताना दिसत आहे. यातच मित्राच्या बहिणीच्या हळदीवरुन परत येत असताना मध्यरात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास सावदा ते पिंपळ रस्त्यावर चारचाकी वाहनाने झाडाला जोरदार धडक दिल्याने तिघे जण जागीच ठार झाले, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की होंडा कंपनीच्या गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
मित्राच्या बहिणीच्या हळदीवरुन जाताना अपघात
जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील पाच मित्र भुसावळ येथील एका मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. भुसावळकडून सावदा मार्गे रावेरकडे येत असताना त्यांच्या एमएच २० सीएस ८००२ गाडीने भरधाव वेगात झाडाला जोरदार टक्कर दिली. यात रावेर शहरातील शुभम सोनार वय २५ मुकेश रायपूरकर वर २३ सह अजून एक जण ठार झाला आहे.
तर इतर दोघे जयश भोई, गणेश भोई फोटोग्राफर जखमी असून जळगाव येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. अपघाताची वार्ता रावेर शहरात पसरताच एकच खळबळ उडाली.हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.