संत गाडगेबाबांना ६८ व्या पुण्यतिथीदिनी अभिवादन
अमरावती :- स्वतःच्या आचरणातून स्वचतेचे धडे देणाऱ्या संत गाडगेबाबांचा ६८ वा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला . भुकेल्यानं अन्न , तहानलेल्याना पाणी परोपकार, दया करण्याचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबाच्या पुण्यतिथी निमित्य विविध कार्यक्रम राबवण्यात आले . संत गाडगेबाबा समाधीस्थळ गाडगेनगर येथे बाबांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आलं. भजन प्रवचन,अन्नदान, ब्लँकेटचं वितरण करून श्री बाबांच्या समाधी स्थळाच्या परिसरात संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता अभियान राबविण्यात आल.
संत गाडगे बाबांनी 19 व्या शतकात अज्ञान, अस्वच्छता अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाच्या उद्धारासाठी आपला देह चंदनासारखा झिजवत अतुलनीय अकल्पनीय अविश्वसनीय कार्य केलं. “कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या ६८ व्या पुण्यतिथी निमित्त ” संत गाडगेबाबा नगर अमरावती येथील श्री बाबांच्या पवित्र समाधीस्थळी विविध उपक्रम राबवून त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले. गोपाळ गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाच्या माध्यमातून नामसमरणाचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांची पुण्यतिथीनिमित्य पूजा आरती करण्यात आली. संस्थेचे प्रमुख विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात सागर देशमुख व्यवस्थापक प्रकाश महात्मे यांच्या आयोजनातून, श्री बाबांच्या पुण्यतिथी सेवासप्ताह निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले गरजूंना अन्नदान यावेळी करण्यात आलं.
संत गाडगेबाबांनी हाती खराटा घेउन स्वछतेचा संदेश दिलाय. श्री बाबांच्या समाधी स्थळाच्या परिसरात संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गरजुंना ब्लँकेटची वितरण करण्यात आलं काकड आरती, श्री बाबांची सामुदायिक प्रार्थना, स्वच्छता अभियान, त्यानंतर ह.भ.प. वाणीभूषण सोपान महाराज सरोदे यांच्या अमृततुल्य वाणीतून भागवत कथा श्रवणाचा लाभ भाविकांनी घेतला