Amaravti GraminCrime NewsLatest News
५ लाख द्या अन्यथा नोकरी जाईल महिला कर्मचारीला केली पैशाची मागणी

परतवाडा :- आर टी आय चा वापर अनेक ठिकाणी गैरवापरा करिता केला जात आहे असे अनेक पोलीस स्टेशनं येथे दाखल होत असलेल्या तक्रारी वरून समोर येत आहे.. असाच गुन्हा परतवाडा पोलिसांनी एका युवकाविरुद्ध दाखल केला. परतवाडा अचलपूर जुळ्या नगरीत शासकीय नोकरीला असलेल्या महिला कर्मचाऱ्यांची त्याने आर टी आय अंतर्गत सर्व माहिती काढली.
तिला कार्यालय बाहेर बोलाऊन 5 लाखाची खंडणी मागितल्याची माहिती दिलेल्या पोलीस तक्रारीत महिलेने केली आहे.तुमचे रेकॉर्ड काढल्यास तुमची नोकरीं जाऊ शकते.. नोकरीं टिकवायची असेल तर 5लाख द्या अशी मागणी त्या युवकांने केली.अखेर महिलेने परतवाडा पोलीस स्टेशनं गाठून तक्रार दाखल केल्या ने धारणी येथे राहणाऱ्या युवकां विरुद्ध पोलिसांनी खंडणी चा गुन्हा दाखल केला.