LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

अचलपूर स्टेट बँकेतील अस्थायी कर्मचाऱ्यांचं उपोषण

अचलपूर :- टेट बँक ऑफ इंडिया च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कायम करण्याच्या मागणीसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं भारतीय स्टेट बँक मुख्य शाखा अचलपूर येथे १९९६ ते २००३ या सात वर्षात कंत्राटी पद्धतीने तिघांनी मदतनीस म्हणून काम केले.२४० दिवस काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याच प्रावधान आहे परंतु या तिघांना कायम न केल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिला.

अचलपूर येथील स्टेट बंकेच्या मुख्य शाखेत ७ वर्षांहून अधिक दिवस काम करणाऱ्या अरुण चन्दूप्रसाद दीक्षित, सुनील पांडुरंग आठवले,व राजेश बळीराम आके या तिघांनी अस्थायी कर्मचारी म्हणून काम केलं. या तिघांनाही नोटीस न देता कामावरून काढून टाकण्यात आली. याविरोधात त्यानी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. या तिघनजवळ बँकेत काम केल्याचं प्रमाणपत्रही आहे २४० दिवस काम केल्यास कायम नोकरी देण्याचं प्रावधान आहे असं असतानाही त्याना कामावरून कमी करण्यात आलं. न्याय न मिळाल्यास कुटुंबासह उपोषणाचा इशारा यतीन कर्मचाऱ्यांनी दिलाय.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!