अमरावती ग्रामीण पोलिसांच्या क्रीडा स्पर्धा
पोलीस सतत ताणतणावात काम करतात कोणताही सण उत्सव असो तो निर्विघन पार पडण्याची जबाबदारी पोलिसांची असते आपलं कुटुंब आपला आनंद, बाजूला ठेऊन ऊन थंडी पावसात आपलं कर्त्यव्य बजावणाऱ्या पोलीसांच्या खिलाडू वृत्तीला वाव देण्यासाठीअमरावती ग्रामीण पोलीस क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं यंदाचा जनरल चंपीयनशिप अमरावती शहर पोलिसांनी पटकावली.
अमरावती ग्रामीण पोलीस विभागाच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये . 5 जिल्ह्यातील 768 पोलीस खेळाडूनि विविध खेळात सहभाग घेतला. यंदाचा जनरल चंपीयनशिप अमरावती शहर पोलिसांनी जिंकले १५ ते १९ डिसेंबर दरम्यान क्रीडा महोत्सव घेण्यात आला. अमरावती ग्रामीण पोलीस विभागातील 163 खेळाडू नी सहभाग घेतला.यंदाचा जनरल चंपीयनशिप अमरावती शहर पोलिसांनी पटकावली. 20 डिसेंबर च्या सायंकाळी जोग स्टेडियम येथे शानदार बक्षीस वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात नृत्य,तसंच मल्लखांब चं सादरीकरण करण्यात आलं….. . विजेत्या टीम ला मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
जिल्हाधिकारी सौरभ कटीयार एस पी विशाल आनंद सह वरिष्ठ पोलीस अधिकारी विरुद्ध पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांत रस्सीखेच चा मैत्रीपूर्ण सामना रंगला.बक्षीस वितरण कार्यक्रमाला अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा,अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, अमरावती एस आर पी एफ कमाडंट 5जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सह शेकडो पोलीस बांधव उपस्थित होते.
आरोग्य अबाधित राहावं यासाठी खेळ आवश्यक आहे मात्र पोलिसांच्या धकाधकीच्या जीवनात अन्य कोणत्याही गोष्टीला वाव नसतो. त्यासाठी आवर्जून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत. जेणेकरून पोलिसांच्या क्रीडा गुणांना वाव मिळेल व वातावरणात बदल होईल.