उबाठा गटाला लागली घरघर, अनेकांनी सोडली साथ
नुकतीच विधानसभा निवडणूक संपली.. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला राज्यात काहीच जागावर समाधान मानावं लागलं तर सर्वांचे लक्ष असलेल्या बडनेरा मतदार संघात सुद्धा उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार व बंडखोर उमेदवाराचा सुद्धा पराभव झाला.. अशात मात्र उद्धव विरुद्ध एकनाथ शिंदे पैकी शिंदे गटाला चांगलेच यश मिळाल्याने उद्धव ठाकरे गटातील असंख्य पदाधिकारी नी चालत्या गाडीत बसण्याचा निर्णय घेतला.. यासोबतच पक्षात अनेक कारणे सांगून अनेक उबाठा पदाधिकारी नी दोन दिवसा आधी थेट नागपूर हिवाळी अधिवेशनात असलेले उपमुख्यमंत्री.
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कँप्टन शिवसेना सचिव अभिजित अडसूळ यांच्या मार्गदर्शनात पक्षात जाहीर प्रवेश केल्याने अमरावती जिल्ह्यात उबाठा गटाला चांगलीच खिंडार पडल्याचे आता स्पष्ट झाले.. अमरावती जिल्ह्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथील देवगिरी निवासस्थानी येऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यामध्ये अमरावतीचे जिल्हाप्रमुख श्याम देशमुख, आशिष धर्माळे, माजी नगरसेविका वर्षा भोयर, ललित झंझाड, तसेच नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला. सर्वांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत केले.. तर दुसरीकडे याच उबाठा गटात अनेक वर्ष निस्ताने दाम्पत्यांनी बाळासाहेब ठाकरे पासून तर उद्धव ठाकरे पर्यत निष्ठ्हेने काम केले.. तपोवन प्रभागात आधी शिवसेनेचे च नाव नव्हतं त्याच चौकाला मातोश्री नामफलक लावून दरवर्षी शिवसेनेच्या वतीने सामाजिक धार्मिक राजकीय कामे करून शिवसेना घराघरात पोहोचवली.. त्यात दिवंगत अमोल निस्ताने यांच्या पत्नी माजी नगरसेविका स्वाती निस्ताने यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक भाजपा पक्षात प्रवेश केल्याने पुन्हा अमरावती शहरातील उबाठा गटात खळबळ उडाली.. एका मागे एक दिग्गज आणि निष्ठावान पदाधिकारी मनपा निवडणुकीच्या आधी दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत असल्यामुळे आता जिल्ह्यातील उबाठा शिवसेना संपनार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.. या सोबतच आगामी मनपा निवडणुकीत भाजपा 60जागा जिंकणार असा दावा सुद्धा भाजपा जिल्हा अध्यक्ष आ प्रवीण पोटे यांनी केला आहे