घडलेला प्रकार फारच गंभीर असून दोशींवर कारवाई झाली पाहिजे – शरद पवार

संविधान शिल्पाच्या मोडतोड झाल्याची घटना घडल्यानंतर परभणीत मोठा हिंसाचार उसळला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणताना अनेकांची धरपकड केली. हिंसाचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबाची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली.
पवारांनी सूर्यवंशी कुटुंबाचं सांत्वन केलं. सोमनाथच्या परिवाराची व्यथा ऐकून घेतली. तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू आणि न्याय मिळून देऊ, असा शब्द पवारांनी सूर्यवंशी कुटुंबाला दिला.यावेळी सोमनाथच्या कुटुंबियांनी पवारांनी सोमनाथच्या समाजकार्याची माहिती देणारी कागदपत्रं दाखवली. शरद पवारांनी सूर्यवंशी कुटुंबाचं सांत्वन करत त्यांना धीर दिला. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्ही तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू. तुम्हाला न्याय मिळवून देऊ,’ असं आश्वासन पवारांनी सूर्यवंशी कुटुंबाला दिलं.
केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवाराचीही शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी देशमुख यांच्या परिवारासाठी मोठी घोषणा केलीये. संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची कॉलेजपर्यंतची जबाबदारी आम्ही घेत असल्याचं पवारांनी जाहीरपणे सांगितलं. त्यासोबतच या प्रकरणाच्या खोलात जात मुख्य सूत्रधाराला तातडीने धडा शिकवावा अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे. या प्रकरणाच्या खोलात गेलं पाहिजे. ज्या सरपंचांनी १५ वर्षे काम केलं त्यांची हत्या केली गेली. हे अतिशय गंभीर आहे, मुख्यमंत्री यांनी आश्वासन आणि रक्कम दिली मात्र याने कुटुंबाची दुःख जावू शकत नाही. दहशतीचे वातावरण आहे, याला आपण सर्व जण तोंड देऊ. देशमुख यांच्या मुलीला बारामतीच्या वस्तिगृहात पाठवा, असं शरद पवार यांनी म्हटलं.